breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रराजकारण

जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ: शरद पवार

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे, आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. रेणू शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती, त्यांनंतर धनंजय मुंडेंनी रेणूच्या बहिणीसोबत आपले सहमतीनं संबंध असल्याचं फेसबुक पोस्टमधून कबूल केलं होतं. त्यानंतर आता हा वाद चिघळला आहे. 

धनंजय मुंडेंनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सर्व माहिती दिल्याचं पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, धनंजय मुंडे मला काल भेटले आणि आरोपाची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार काही व्यक्तींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच या तक्रारी तयार झाल्या आहेत. याबाबत हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत कोर्टात सुनावणी होणं बाकी असल्याचं पवारांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button