breaking-newsराष्ट्रिय

हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे २० हजार कर्मचारी बेमुदत संपावर

लष्करी साहित्याची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील २० हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. वेतन वाढ व इतर मागण्यांसाठी कर्मचारी आजपासून (१४ ऑक्टोबर) संपावर गेले असून, या संपामध्ये नाशिकमधील ओझर येथील ३५०० हजार कर्मचाऱ्यांसह देशातील नऊ केंद्रातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही लष्करी विमान निर्मिती करणारी भारताची सरकारी कंपनी आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेतन वाढ व इतर मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यापूर्वी प्रशासनाला दिलेल्या पत्रात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील कामगार संघटनांच्यावतीने ३५ टक्के पगारवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने ८ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव कामगार संघटनांसमोर मांडला असल्याची माहिती कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. त्याशिवाय अधिकारी आणि कामगारांना असलेल्या भत्त्यांमध्ये असमान वाढ असून अधिकारी आणि कामगारांना समान वाढ मिळाली पाहिजे अशी मागणीही कामगार संघटनांनी केलेली आहे.

यासंदर्भात बोलताना हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड कामगार युनियनचे महासचिव एस. चंद्रशेखर म्हणाले, “व्यवस्थापनाशी सलोखापूर्ण चर्चा करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आमच्या मागण्या पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. विशेषतः वेतनासंदर्भातील निर्णयासंदर्भातही. त्यामुळे प्रशासनाला यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सोमवारपासून बेमुदत संपावर जात आहोत,” असं चंद्रशेखर म्हणाले. तर “सुधारित वेतन श्रेणी १ जानेवारी २०१७पासून लागू करण्यासाठी कामगारांनी पुकारलेला हा संप टाळण्यासाठी व्यवस्थापन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे,” असं व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

  • कामगारांचं म्हणणं काय?

चांगला वेतन करार देण्याच्या आश्वसनानंतर व्यवस्थापनाने पाच वर्ष मुदतीच्या वेतन कराराची मागणी सोडून सर्व कामगार संघटना १० वर्ष मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या आहेत. परंतु त्यानंतरही व्यवस्थापनाने कामगारांची केवळ निराशा केली आहे. अधिकारी वर्गाला ३५% इतकी वाढ दिलेली असताना कामगार वर्गाला तुटपुंजी फक्त ८% वाढ देण्याचा अंतिम प्रस्ताव दिला आहे, असं कामगारांचं म्हणणं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button