breaking-newsTOP NewsUncategorizedराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींची मास्क न घालण्यावरून ‘आप’ने उडवली खिल्ली

मार्चमध्ये कोरोनामुळे देशात लॉकडाऊन केल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून सातत्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा, असे आवाहन मोदींकडून नागरिकांना सातत्याने केले जात आहे. मात्र पंतप्रधान स्वतःच सार्वजनिक ठिकाणी विना मास्कचे दिसल्याने आता त्यांना ट्रोल केले जात आहे.

आम आदमी पक्षाकडून पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओत मोदींनी मास्क लावला नसल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोदींना ट्रोल केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तकला मेळाव्याला भेट दिली होती. यावेळी मोदी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या गोष्टी पाहत होते. याठिकाणी फिरताना मोदींच्या तोंडावर मास्क नव्हता. तेव्हा एका स्टॉलवरील माणसाने पंतप्रधान मोदी यांना मास्क देऊ केला. वारंवार आग्रह करुनही मोदी मात्र मास्क घेण्यास नकार देताना व्हिडीओत दिसत आहेत.

‘मास्क घाला, मोदींजींसारखे वागू नका’, असे कॅप्शन लिहित आपकडून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. कोरोना सकंट असतानाही मास्क न लावणाऱ्या अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देखील अनेकांनी मोदींची तुलना केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button