breaking-newsमनोरंजन

कंगणा रणावत देणार हृतिक रोशनला टक्कर

गेल्या काही दिवसांपासून कंगणा रणावत हृतिक रोशनला टक्कर देण्याची तयारी करते आहे. ती सध्या “मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी’मध्ये व्यस्त आहे. हृतिक रोशनच्या “सुपर 30′ बरोबरच तिचा “मणिकर्णिका’ हा केवळ हृतिकला टक्कर देण्यासाठीच येतो आहे. हे दोन्ही सिनेमे पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास रिलीज होणार आहेत.

हृतिक रोशनला अडचणीत आणण्यासाठी कंगणाला आता अक्षय कुमारही मदत करणार आहे. “मणिकर्णिका’च्या ऑफिशियल ट्रेलरचे लॉंचिंग अक्षय कुमारच्या “गोल्ड’ बरोबरच म्हणजे यावर्षी 15 ऑगस्टच्या सुमारास येणार असल्याचे समजते आहे.

“मणिकर्णिका’ खरे तर याच वर्षी रिलीज होणार होता. मात्र त्यात व्हीएफएक्‍स इफेक्‍टसचे बरेच काम बाकी होते. त्यामुळे रिलीजची तारिख वारंवार पुढे ढकलावी लागत होती. सरत ेशेवटी पुढील वर्षाचा प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त निश्‍चित झाला आहे. पण रिलीज पुढे ढकलण्यामागील खरे कारण हृतिक रोशनला टक्कर देणे हा असल्याचा युक्‍तीवाद आता खरा वाटायला लागला आहे. कितीही झाले तरी कंगणा काही मागे हटणारी नाही. हृतिकच्या जवळ जाण्याची एकही संधी ती सोडणार नाही असे दिसते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button