breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत तरुणाच्या चेह-यावर ब्लेडने वार, चौघांवर गुन्हे दाखल

पिंपरी, (महाईन्यूज) – चर्चेदरम्यान वाद झाल्याने चौघांच्या टोळक्याने एका तरुणाच्या चेह-यावर, हातावर आणि पाठीवर ब्लेडने वार केले. ही धक्कादायक घटना पिंपरीतील हेमु कलानी उद्यानाजवळ घडली.

सागर विशाल पवार (वय २०, रा. सुभाषनगर, धोबी घाट, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणयात मंगळवारी (दि. ४) तक्रार दाखल केली आहे. भरत नावाच्या तरुणासह तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सागर त्याच्या मित्रासोबत गुरुवारी (दि.३०) रात्री सव्वाआठच्या सुमारास पिंपरीतील हेमु गार्डन जवळून जात होता. यावेळी समोरुन भरत आणि त्याचे तिन साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी सागरसोबत बाचाबाची केली. त्यांच्यात जोरदार भांड झाल्याने सागरच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पाठीवर ब्लेडने वार केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button