breaking-newsमनोरंजन

दीपिका पाठोपाठ शाहिद कपूरही लंडनला

बॉलीवूडमधील सुपरहिट चित्रपट “पद्मावत’मध्ये राणी पद्मिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच लंडनला गेली आहे. तिने लंडनमधील विमानतळावरील एका फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या असून त्यात ती खूपच उत्साही असल्याचे दिसते. दीपिका लंडनला गेल्याची बातमी कळतेच न कळते तिच्या पाठोपाठ शाहिद कपूरही लंडनला गेला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे दोघे लंडनला जाण्याचे कारण काय? तर हे दोघे लंडनला जाण्याचे कारण आहे “मादाम तुसॉं संग्रहालय’.

बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर आता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता शाहिद कपूरचाही मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसॉं संग्रहालयात तयार केला जाणार आहे. शाहिद सध्या यासाठी लंडनला गेला आहे.

शाहिद कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्याचा एक फोटो त्याने चाहत्यांसाठी शेअर करुन त्याच्याही पुतळ्याची वर्णी लवकरच लंडनच्या मादाम तुसॉं संग्रहालयात लागेल, असे सांगितले आहे.
“पद्मावत’ चित्रपटात शाहिद आणि दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच एकत्रीत काम केले. दोघांनी या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकारली होती. संजय लीला भन्साळी यांनी याचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमविला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button