breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ खडसेंना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत ईडीकडून कारवाई नाही

मुंबई – पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना तुर्तास दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात 17 फेब्रुवारीपर्यंत खडसेंविरोधात कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी ईडीने उच्च न्यायालयात दिली आहे.खडसेंविरोधात गुन्हा रद्द करावा. तसेच, प्रकरण प्रलंबित असेपर्यंत ईडीला कठोर कारवाईपासून रोखण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

उच्च न्यायलायतील सुनावणीवेळी एकनाथ खडसेंची वकील आबाद पोंडा हे इतर कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुढील सुनावणीसाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत खडसेंविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, अशी हमी ईडीने दिली.

दरम्यान, राज्यात मंत्री असताना एकनाथ खडसेंनी भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा सध्या ईडीकडून तपास केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button