breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी काँग्रेसश्रेष्ठींनी साधं ट्विटही केलं नाही : नितेश राणे

मुंबई | प्रतिनिधी

संपूर्ण दिवसभरात काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी संदेश किंवा साधे ट्विटही करण्यात आले नाही. काँग्रेस बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेणार नसेल तर मग शिवसेनेकडे उरले तरी काय, असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आठवा स्मृतीदिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यानिमित्ताने राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली होती. तर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवाजी पार्क येथे शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पंकजा मुंडे, रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. तर इतर नेत्यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button