breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे हुकूमशाह भडकला, मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांना गोळी मारण्याचे आदेश

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने परत एकदा आपले कौर्य दाखवले आहे. किमने देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. हुकूमशाहच्या आदेशावर त्या पाचही अधिकाऱ्यांना गोळी मारण्यात आली.

नॉर्थ कोरियातील प्रकरणांवर नजर ठेवणाऱ्या साउथ कोरियातील साइट डेली एनकेने सांगितल्यानुसार, अर्थ मंत्रालयातील या पाच अधिकाऱ्यांनी डिनर पार्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा केली होती. यादरम्यान त्यांनी किमच्या निर्णयांची निंदा केली होती.

साउथ कोरियन साइटनुसार, या चर्चेची माहिती किम जोंगला कोणीतरी दिली. त्यानंतर किमने त्यांच्याकडून कबुल करुन घेतले की, त्यांनी देशाला कमजोर करण्याचे कृत्य केले आहे. त्यानंतर 30 जुलै रोजी त्या सर्व अधिकाऱ्यांना गोळी मारली.

सत्तेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी किम जोंगने त्याचे काका किम जोंग थाएकला 120 उपाशी कुत्र्यांना खायला दिले होते. चीनी वृत्तपत्र‘वेन वई पो’ ने दावा केला होता की, शिक्षेदरम्यान किम जोंगसह 300 अधिकारी समोर उपस्थित होते. या सर्वांसमो 67 वर्षीय थाएकला शिकारी कुत्र्यांना दिले होते. थाएकच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या थाएकाच्या पत्नीलाही विष देऊन मारले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button