breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णासाहेब मगर स्टेडियम इमारतीसाठी तब्बल दोनशे कोटीचा खर्च

पिंपरी |महाईन्यूज|

नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मैदान व इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त मैदानाचा विकास केला जाणार आहे. मगर स्डेडिअममध्ये क्रिकेटचे मैदान, क्‍लायबिंग बॉल, ऍथलेटिक्‍सचा सिंथेटीक ट्रॅक, होस्टेल, टेनिस कोर्ट, बास्केट बॉल आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

या अद्यावत क्रीडासंकुलाच्या प्रकल्पाचे महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते व अधिकाऱ्यांसमोर सल्लागारांने सादरीकरण केले. या वेळी महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकारी उपस्थित होते. सस्यस्थितीत मगर स्टेडिअमची इमारत धोकादायक स्थितीत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली.

त्याठिकाणी 25 एकर जागेत अद्यावत क्रीडासंकुल तयार करण्यात येणार आहे. नव्या क्रीडासंकुलामध्ये प्रत्येक खेळाची स्वतंत्रे मैदाने असणार आहेत. त्यामध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, टेनिस यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे ऍथलेटीक्‍सचा 400 मीटरचा सिथेंडीक ट्रॅक बांधण्यात येणार आहे. तिथेच भव्य कार्यालय बांधण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मैदानामध्ये जलतरण तलाव आहे. त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यातील पाणी शुद्धीकरणासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. खेळांडूंना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय करण्यात येणार आहे.

या मैदानाच्या परिसरामध्ये कल्ब हाऊस तयार करण्यात येणार आहे. खेळाडू व प्रेक्षकांसाठी प्रशस्त वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. तसेच, सध्याचा जुना क्‍लायबिंग वॉल पाडून नव्या नियमानुसार क्‍लायबिंग वॉल उभारला जाणार आहे. दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूूर्ण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button