breaking-newsराष्ट्रिय

हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार; उत्तर प्रदेशात केली घोषणा

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बुधवारी एका सभेमध्ये त्याने याची घोषणा केली. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

हार्दिक पटेलने वयाची पंचवीशी पूर्ण केली आहे. यापूर्वी निवडणूक लढवण्यासाठी त्याचे वय बसत नव्हते. दरम्यान, गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याने राज्यासह देशात रान पेटवले होते. या आंदोलनामुळे त्याला एक युवा नेता अशी ओळख मिळाली. दरम्यान, त्याने जनतेच्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले त्यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलने केली. समविचारी संघटनांच्या तो कायमच व्यासपीठावर दिसला. मात्र, आता लोकसभेत जाऊन जनतेसाठी काम करायची त्याची इच्छा असल्याने त्याला निवडणुक लढवण्याचे वेध लागले आहे.

२०१७ मध्ये हार्दिकने सभेत बोलताना अजून माझं वय तर होऊ द्या, असे म्हणत सूचक विधान केले होते. नुकतेच त्याने निवडणूक लढवण्याचा इन्कारही केला होता. दरम्यान, काँग्रेसचा हार्दिकला कायमच पाठिंबा दिला असून जर हार्दिकचा विचार असेल तर त्याला आम्ही उमेदवारी देऊ, असे गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी म्हटले होते.

त्यामुळे जर हार्दिक खरोखरच लोकसभा लढवण्यात तयार असेल तर तो गुजरातच्या अमरेली मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. हार्दिकला पाठींबा देताना या ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार देणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button