breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देशात सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दडपला जातोय

विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा पिंपरीतील आबेडकर चाैकात विविध संघटनांतर्फे निषेध

पिंपरी |महाईन्यूज|

एनआरसी व सीएबी विधेयकाविरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे निदर्शन करणार्‍यांवर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केली आहे. जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर देखील लाठीचार्ज करण्यात आली. विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्था व संघटनांनी विरोध केला. या वेळी लोकशाहीत सर्वसामान्यांचा आवाज दडपला जातोय, अशा भावना संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केल्या. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्‍त करण्यात आला.

यावेळी काशिनाथ नखाते, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, मानब कांबळे, मारूती भापकर, सतिश काळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन, रयत विद्यार्थी विचार मंच, फेरीवाला क्रांती महासंघ, नागरी हक्‍क सुरक्षा समिती, ओबीसी संघर्ष समिती, संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, नागरी हक्‍क सुरक्षा समिती आदींसह समविचारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

याप्रसंगी नागरी हक्‍क कृती समितीचे मानव कांबळे म्हणाले की, देशात सर्वसामान्यांनी आवाज उठवला तर त्यांच्यावर पोलिसांकरवी लाठीहल्‍ला केला जात आहे. एनआरसी व सीएबी विरोधात मोठा विरोध नागरिक दर्शवत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करत आहे. मात्र या दडपशाहीला कोणी घाबरत नाही. त्याविरोधात ऊलट नवीन नेतृत्त्व तयार होऊन जनआंदोलन उभा केले जात आहे.

फेरीवाला क्रांती महासंघाचे काशिनाथ नखाते म्हणाले की, श्रमिक, कामगार, नागरिकांच्या हितांचे मुळ मुद्यांवरून लक्ष विचलित केले जात आहे. सर्वसामान्यांशी निगडीत नसणारे विधेयक समोर आणले जात आहे. त्यापेक्षाही अन्‍न, वस्त्र निवारा या गोष्टींकडेही केंद्र सरकारने लक्ष द्यावे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड म्हणाले की, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकमध्ये आम्ही भारतीय लोक असा उल्‍लेख आहे. त्यामुळे अन्यायाविरोधात आवाज उठविणे हे इथल्या जनतेचे प्रथम कर्तव्य आहे. अन्याया विरोधात आवाज उठविल्यानंतर मात्र केंद्रातील सरकार कारवाईचा बडगा उगारत आहे. नागरिकांवर कारवाई करत आहे. संविधानाच्या मुल्यांनाच पायदळी तुडविण्याचे काम सरकार करत आहे.

रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे म्हणाले की, जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर चुकीचे आरोप केले जात आहेत. देशात खर बोलायचे नाही, अशी मानसिकता सरकार करत आहे. देशात हिटलरशाही व दमनशाही चालू आहे. जनतेला हव असलेले सरकारला नको आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा व गाणी सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करताना विविध संघटनांचे पदाधिकारी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button