breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वह्या, तरतूद प्रस्तावाला स्थायीची मान्यता

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षातील सहामाही सत्रात वह्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुधारित अंदाजपत्रकात 81 लाख रुपयांची तरतूद करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वाढल्याने पुढील सहामाही सत्रात त्यांना वह्यांचा तुटवडा भासणार आहे. याबाबत शाळा मुख्याध्यापक आणि विभागीय पर्यवेक्षक यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या आतिरिक्त वह्यांचा पुरवठा केला जाणार आहे. या वह्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमासाठी वाटप केल्या जाणार आहेत.

या कामासाठी पुण्यातील मे. सनराज प्रिंटपॅक इंडस्ट्रिज यांच्याकडून खरेदी करण्यासाठी शिक्षण समितीने खर्चाचा तपशील सादर केला. त्यासाठी 81 लाख रुपयांची तरतूद सुधारित अंदाजपत्रकात करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button