मोदी सरकार जनतेसमोर मांडणार चार वर्षांची कामगिरी

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकार लवकरच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यानिमित्त सरकारची कामगिरी जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशातूून पुढील काही दिवस अनेक पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 या दिवशी सुत्रे स्वीकारली.
आता पुढील लोकसभा निवडणुकीला वर्षभराचाच कालावधी उरला असल्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या धोरणात्मक पाऊलांची माहिती जनतेसमोर ठेवण्यावर सरकार भर देणार आहे. उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना या गरिबाभिमुख पाऊलांचे प्रामुख्याने सादरीकरण केले जाईल. त्यासाठी किमान चार केंद्रीय मंत्री 24 ते 28 मे या कालावधीत देशाची राजधानी दिल्लीत पत्रकार परिषदा घेणार आहेत.
अशाच पत्रकार परिषदांचे आयोजन 29 मे ते 3 जूून या कालावधीत देशातील सुमारे 40 शहरांमध्ये केले जाणार आहे. या पत्रकार परिषदांवेळी सरकारची कामगिरी अधोरेखित करणाऱ्या पुस्तिकांचे वाटप केले जाईल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.