breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शॉर्टकटने खाली उतरण्याच्या नादात खोल दरीत अडकला तरुण

शिवदुर्ग रेस्क्यू टीमने वेळीच मदत केल्याने 20 वर्षीय तरुणाला मिळाले जीवदान

पुणे |महाईन्यूज|

अतिउत्साही पणामुळे एका 20 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला असता. परंतु शिवदुर्ग रेस्क्यू टीमने वेळीच मदत केल्याने त्या तरुणाला जीवदान मिळाले आहे. यश कासाट असे पर्यटकाचे नाव आहे.

पुण्याहून मित्रासमवेत विसापूर किल्ल्यावर पर्यटनाला काहीजण आले होते. मित्रांसोबत फिरत असताना धोकादायक कड्यावरून शॉर्टकटने खाली उतरण्याच्या नादात यश अशा ठिकाणी जाऊन अडकला, जिथून त्याला वर तसेच खाली जाता येत नव्हते. अतिउत्साही पणामुळे केलेला स्टंट हा जीवावर बेतणार हे लक्षात आल्यावर यशने मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली. त्याच्यासोबत आलेल्या इतर मित्रांनी पाटस गावातील ग्रामस्थांच्या मदतीने कड्यावरून यशला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले.

‘शिवदुर्ग’ रेस्क्यू टीमला विसापूर किल्ल्यावर बचावकार्यासाठी बोलवण्यात आले. क्षणाचाही विलंब न करता रोहीत वर्तक, योगेश उंबरे हे हार्निस बांधून सर्व साहित्य सोबत घेत कड्यावरून मार्ग काढत खाली उतरले. तसंच अडकून पडलेल्या यश याच्यापर्यंत पोहोचले. त्याला दोरीमध्ये हर्निसने लॉक करुन सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले.

तीन तासांपेक्षा अधिक काळ अडकून पडलेल्या यश कासटला परिश्रमाची परीकाष्ठा करत शिवदुर्ग रेस्क्यू टीमने जीवदान दिल्याने पाटस गावातील ग्रामस्थांनीही शिवदुर्गच्या ‘देवदूतां’चे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button