breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दारकोंडे यांचे निधन
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दारकोंडे यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी पाच वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीची मोठी हाणी झाली आहे. असंघटीत कामगारांची मोट बांधून त्यांनी राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
त्यांच्या जाण्याने असंघटित कामगारांचा आधार हरपला असल्याची भावना राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग पुणे जिल्हा अध्यक्षा मीना मोहिते यांनी व्यक्त केली आहे. जयश्री प्रसाद, नितीन गायकवाड, विक्रम पवार, नाना संजय नाना धायगुडे सर्व पदाधिकारी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.