breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानातील निवडणूकीत हाफिझ सईदचा मुलगा, जावईही उमेदवार

लाहोर – पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी होणाऱ्या निवडणूकीमध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईदचा मुलगा आणि जावई हे देखील उमेदवार असणार आहेत. त्याशिवाय सईदच्या जमात उद दावा या संघटनेच्यावतीने तब्बल 265 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर झालेला हाफिझ सईद स्वतः ही निवडणूक लढवत नाही आहे.

“जमात उद्‌ दावा’चे उमेदवार या निवडणूकीसाठी “मिइल्ली मुस्लिम लीग’या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. मात्र पाकिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाने आक्षेप घेतल्यानंतर पाकच्या निवडणूक आयोगाने “एमएमएल’ला राजकीय पक्ष म्हणून नोंदणी नाकारली आहे. त्यामुळे हाफिझ सईदने “अल्लाहउ अकबर तेहरीक’ या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

“एमएमएल’च्या पाठिंब्यावर निवडणूकीत उतरलेल्या 265 उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारले आहेत. त्यामध्ये संसदेसाठी 80 तर प्रांतिक विधानसभेच्या 185 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यात हाफिझ सईदचा मुलगा हाफिझ ताल्हा सईद आणि जावई हाफिझ खालिद वालिद यांचा समावेश आहे.

संसदेसाठी लाहोरमधील 4, पंजाब विधानसभेसाठीच्या 15 जागांसह इस्लामाबाद आणि रावळपिंडीतल्या संसदेच्या जागांवरही हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button