breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Smart City Project : कोकणे चौकातील रिंग रोडवर भूमिगत व्यापारी संकुल साकारणार

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात रिंगरोडवर भूमिगत पालिका बाजार व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये फेरीवाला झोन याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. या व्यापारी संकुलात 270 चौरस फुटाची 55 दुकाने काढण्यात येणार आहेत. या व्यापार संकुलासाठी 45 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

  • स्मार्ट सिटी अंतर्गत नाविण्यपुर्ण उपक्रम म्हणुन पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक येथे रिंगरोडवर (एचसीएमटीआर) दिल्ली येथील भूमिगत पालिका बाजार व्यापार संकुलाप्रमाणे भुमिगत व्यापार संकुल आणि फेरीवाला झोन (Commercial Zone/Hawker Zone) करण्याचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा नाविण्यपूर्ण उपक्रम असून या व्यापारी संकुलात सुमारे ५५ दुकाने असणार आहेत. दुकानाचे क्षेत्र २७० चौरस फुट असणार आहे. त्यामध्ये फुले, फळे आईस्क्रिम, महिला प्रसाधने, केकशॉप, Electronic Gazette Shops, Boutiques इत्यादीचा समावेश असणार आहे. Shopping Complex च्या निम्या भागावर Slab (छत) असून त्यावरुन HCMTR मधील सेवा रस्त्यावरील वाहनांची वाहतूक होणार आहे.

रस्त्याच्या खाली Shopping गाळे राहणार आहेत.  Shopping व Hawker Zone चा भाग मध्यभागी मोकळा असेल.  मध्यभागी World Class landscaping  किंवा street furniture असेल Shopping Complex मध्ये उतरण्यासाठी अत्याधुनिक सरकत्या जिन्याचे (Escalator) नियोजन केले आहे. तसेच, अत्याधुनिक छोटेखानी उद्यानासह धवधबा (Cascade) असणार आहे. हे व्यापारी संकुल शहरातील एक नाविण्यपुर्ण आकर्षण असेल. Shopping Complex च्या एका बाजुला कोप-यातील जागेमध्ये सर्वोत्तम Gazette Shop असणार आहे. अशा पध्तीदतीने ख-या अर्थाने पाश्चिमात्य देशाप्रमाणे शहरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे Shopping Complex उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.

  • प्रकल्पासाठी अंदाजे ४५ कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच, सदर प्रकल्प मान्यतेकामी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळापुढे सादर करण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या सुचनांचा अंतर्भाव करुन अपेक्षित बदल स्विकारुन आराखडे अंतिम केले जाणार आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button