breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेच्या सत्तेत बायडन की पुन्हा ट्रम्प? आज मतदान

वॉशिंग्टन – जगावर कोसळलेल्या कोरोना संकटात आज बलाढ्य अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत आज रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचे मोठे आव्हान आहे. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल. मतदारांना या वेळेदरम्यान पोलिंग बूथवर जाऊन मतदान करता येणार आहे.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये निवडणूक लढत होत आहे. व्हाईट हाऊसवर दुसऱ्यांदा कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले डोनाल्ड ट्रम्प हे 74 वर्षांचे आहेत, तर त्यांचे विरोधक ज्यो बायडेन हे 77 वर्षांचे आहेत. त्यामुळे अमेरिकेला आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे. दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधीच विक्रमी मतदान झाले आहे. Early Ballots Votesनुसार, पोस्टल, ई-मेलद्वारे आतापर्यंत जवळपास ९ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेकांनी Early Ballots Votesद्वारे मतदान केले असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button