पिंपरी / चिंचवड

चाकण एमआयडीसी मधील कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण एमआयडीसी मधील सनी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी मिळून एका तरुणाकडून 42 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन तरुणाला नोकरी न लावता त्याचे पैसेही परत न करता त्याची फसवणूक केली आहे. ही घटना 24 नोव्हेंबर 2020 पासून 24 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सनी कंपनी चाकण येथे घडली आहे.

सौरभ सदानंद सोरटे (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी गायकवाड (रा. मोरेवस्ती, चिखली), सनी कंपनीतील एच आर बजरंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याने फिर्यादी यांना चाकण एमआयडीसी मधील सनी कंपनीत जॉब लावून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी रवी याने फिर्यादीकडून ऑनलाईन 15 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना सनी कंपनीतील एच आर बजरंग याच्याकडे नेले. तिथे आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 27 हजार रुपये आणि बायोडाटा घेतला. बजरंग याने नोकरी बाबत रवी गायकवाडकडे निरोप देतो असे फिर्यादीस सांगितले. मात्र त्यांना जॉब न देता तसेच घेतलेले पैसे परत न देता त्यांची आरोपींनी फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button