breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भाजपा नगरसेवक तुषार कामठे न्यायासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “दरबारी”

  • बोगस कागदपत्रे देऊन विकासकामांचा ठेका घेणाऱ्यांवर कारवाई होणार?
  • पिंपरी- चिंचवडकर नागरिकांचे उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयाकडे लक्ष

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सफाईच्या कामासाठी बोगस कागदपत्रे सादर करुन पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक करणाऱ्या कंपनी आणि संबंधितांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत नगरसेवक कामठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते गटर सफाईची निविदा प्रक्रिया राबवली आहे. अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कामासाठी सिक्युर आय टी फैसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने निविदा भरली होती.

मात्र, संबंधित कंपनीने बोगस कागदपत्रे, लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी असलेली पत्रे जोडून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची फसवणूक केली आहे. तब्बल ५५ कोटी रुपयांची निविदा चुकीच्या पद्धतीने मिळवून सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या कररुपी पैशाची लूट करण्याचा हा प्रकार आहे.

संबंधित सिक्युर आय टी फैसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने इंदापूर नगरपरिषदेत काम केल्याचा खोटा कार्यादेश आणि प्रामाणपत्र सादर केल्याची बाब इंद्रापूर नगरपरिषद प्रशासनाने मान्य केली आहे. तसा लेखी खुलासाही कळवला आहे. यासह अन्य पुराव्यांची शहानिशा करुन संबंधित कंपनीचे संचालक आणि जबाबदार व्यक्तींवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्फत संबंधित कंपनी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आहे.

तसेच, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे सोपवून संबंधितांना चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घ्यावे. यासह महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मदतीनेच हा घोटाळा झाला असून, सखोल चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे. लोकहिताच्या दृष्टीने मी हा मुद्दा पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.असेही कामठे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पिंपरी- चिंचवडकारांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button