breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

मतदार कोणत्याही धमक्यांना भीक घालणार नाही: रोहित पवार

इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडून कार्यकर्त्यांना शिवीगाळ

पुणे: देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत असल्याने या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत असल्यामुळे हा मतदारसंघ महत्वाचा मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. तसेच एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे की, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button