breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवमध्ये बाल्कनीतून पडून अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपळे गुरव परिसरात राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे . ही घटना सोमवारी ( दि . 13 ) पहाटेच्या सुमारास घडली . गौरी राऊत ( ११ , रा . पिंपळे गुरव ) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी एक व्यक्ती रस्त्याने गौरी राहत असलेल्या इमारतीच्या खालून रस्त्याने जात होता . तेव्हा त्याला गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आहे. त्यानंतर तो व्यक्ती इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने गौरीच्या घराचा दरवाजा ठोठावला होता.

घरातील व्यक्तींना झोपेतून उठवून त्या वाटसरूने घटनेची माहिती दिलेली आहे. त्यानंतर तातडीने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र , रुग्णालयात उपचार करण्यापूर्वी गौरीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झालेला होता.

वाचा- #RainAlert: मुबईसह कोकणात पुढचे 3 ते 4 तास ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button