breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकाशचिन्ह परवाना आणि भूमी जिंदगी विभागाकडून उत्पन्नवाढ अपेक्षीत

  • उत्पन्नवाढ केलेल्या विभागातील कर्मचा-यांचा केला सत्कार
  • स्थायीचे सभापती मडिगेरी, आयुक्त हार्डीकर यांनी केले कौतुक

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी आकाशचिन्ह परवाना आणि भूमी व जिंदगी हे दोन्ही विभाग महत्वाचे मानले जातात. परंतु, चालू वर्षात दोन्ही विभागांना उत्पन्नवाढीचा अपेक्षीत टप्पा पार करता आला नाही. त्यावरून स्थायी समिती सभेत या दोन्ही विभागाकडून आगामी वर्षात उत्पन्नवाढीची अपेक्षा ठेवण्यात आली आहेत.

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणा-या महत्वाच्या विभागांपैकी दोन विभाग सोडले तर पाणी पुरवठा, बांधकाम परवानगी, अग्निशामक विभागाने मोठी कामगिरी केली आहे. या विभागाकडून उल्लेखनिय महसूल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये बांधकाम परवानगी विभागाने मागच्या वर्षी 67 कोटी 10 लाख एवढे उत्पन्न मिळविले होते. यावर्षी या विभागाने 151 कोटी 86 लाख एवढे उत्पन्न मिळविले आहे. पाणी पुरवठा विभागाने मागच्या वर्षी 5 कोटीचा महसूल मिळविला होता. चालू वर्षी 9 कोटी 95 लाख एवढे महसुली उत्पन्न मिळविले आहे. अग्निशामक विभागाने 9 कोटी 18 लाखाचा महसूल मिळविला होता. चालू वर्षी या विभागाने 18 कोटी 27 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.

करआकारणी व करसंकलन विभागाने 185 कोटींचा महसूल प्राप्त केला आहे. तर, यावर्षी 228 कोटी 23 लाखाचा महसूल प्राप्त केला आहे. उत्पन्नवाढीत स्थानिक संस्था कर संकलन समान पातळीवर आहे. उद्यान विभागाने समसमान उत्पन्न टप्पा गाठला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढ केलेल्या सर्व विभागातील कर्मचा-यांचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आणि आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सत्कार केला. तर, उत्पन्नवाढीत पिछाडीवर फेकलेल्या आकाशचिन्ह परवाना विभाग आणि भूमी व जिंदगी विभागाकडून आगामी आर्थिक वर्षात वाढीव उत्पन्नाची अपेक्षा ठेवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button