breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुला मुलगा होत नाही, माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये ! पण विवाहितेने असा दिला झटका…

परभणी : माहेरून २ लाख रुपये घेऊन ये. तुला मुलगा होत नाही, या कारणावरुन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय नागरगोजे, पार्वती नागरगोजे, धोंडिराम नागरगोजे, अर्जून नागरगोजे, शितल नागरगोजे, शोभा फड, वनिता मुंडे आणि उर्मिला मुंडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.या प्रकरणी उर्मिला नागरगोजे या विवाहितेने तक्रार दिली आहे. उखळी बु. येथील दत्तात्रय नागरगोजे यांच्याशी २०१४ मध्ये उर्मिला यांचे लग्न झालेल होते.
लग्नानंतर सुरवातीचे काही दिवस चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करण्यास सुरवात केली. या दरम्यान विवाहितेला दोन मुली झाल्या. त्यानंतर सासरच्या लोकांनी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये. तसेच तुला मुलगा का होत नाही? असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करुन शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली.
मात्र सासरच्या मंडळींच्या वागण्यात बदल झाला नाही. अखेर विवाहितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्तात्रय नागरगोजे, पार्वती नागरगोजे, धोंडिराम नागरगोजे, अर्जून नागरगोजे, शितल नागरगोजे, शोभा फड, वनिता मुंडे, उर्मिला मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.सहाय्यक पोलीस अधीक्षकांना मिळाली गुप्त माहिती, बोगस ग्राहक पाठवले आणि हाती लागले…
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button