breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

तरुणींची खरेदी-विक्री, अपहरणासोबत ISISच्या दहशतवाद्यांचा नवा धंदा, भारतही लिस्टमध्ये!

बुर्किना फासो| आफ्रिकेच्या पश्चिमेस स्थित बुर्किना फासो आजकाल आयसिसचा बालेकिल्ला होत आहे. घनदाट जंगलांच्या मधोमध वसलेला हा परिसर दहशतवाद्यांना लपण्यासाठी अगदी योग्य आहे. पण हे प्रकरण येथेच संपत नाही, दहशतवादी या भागात फक्त लपून बसत नाहीत तर इथल्या संरक्षित वनक्षेत्रात दडलेलं सोने खोदून ते दहशतवादी कारवायांमध्येही वापरत आहेत.

इस्लामिक स्टेट आणि अल कायदा आता आफ्रिकेतील गरीब प्रदेश बुर्किना फासो येथे पोहोचले आहेत अशा पद्धतीची चेतावणी संयुक्त राष्ट्र आणि अनेक खाजगी संशोधकांकडून देण्यात आली आहे. येथे जंगले आणि सोन्याच्या खाणी देखील आहेत. इस्लामी दहशतवादी लोकांसाठी ही मोठी संधी आहे. मोठ-मोठ्या खाणीतून ते सोनं काढून विकत आहेत. इस्लामी दहशत आणखी वाढवण्यासाठी त्यांना याचा फायदा होईल.

बुर्किना फासो हा खरंतर लहान शेतकऱ्यांचा देश आहे. पण आता तो अतिरेक्यांचा गड बनला आहे. 2018मध्ये उपग्रहांच्या मदतीने या गावाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यामध्ये 2200 अशा खाणी समोर आल्या ज्याविषयी कोणालाच माहिती नव्हती. याचबरोबर इथे सोन्याच्या शेकडो खाणी आहेत. सोन्याच्या खाणींमुळे या भागाला तस्कऱ्यांनी लक्ष्य केलं. सोन्याच्या खाणींच्या शोधात जंगलं वेगाने तोडली जात आहेत, ज्यामुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि सरकारने बुर्किना फासोच्या बर्‍याच भागांना संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले. 2018 मध्ये, सहारा वाळवंटच्या दक्षिणेकडील भागात काही हालचाली सुरू झाल्या. तिथे मुस्लिम दहशतवादी घुसले होते. मोठ्या शस्त्र साठ्यासह आलेल्या हत्यारांनी जंगलांचे रक्षण करण्यासाठी तैनात केलेले सैन्य आणि वन कर्मचाऱ्यांना तेथून पळवून लावले. यानंतर स्थानिक शेतकऱ्यांना बोलवून त्यांना खाणी खोदण्यास सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button