breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पिंपरी-चिंचवडला मिळाली पहिली महिला आमदार : विधान परिषद निवडणुकीत उमा खापरे यांचा विजय

मुंबई । विशेष प्रतिनिधी 

विधान परिषद निवडणुकीत भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवडला पहिली महिला आमदार मिळाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अत्यंत चुरशीची झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा बाजी मारली. भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून, या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव झाला आहे. हा पराभव म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २ मते बाद झाल्यानंतर २८३ मते वैध ठरवण्यात आली. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपाचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले. त्यानंतर या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

कोण आहेत उमा खापरे?

पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे. उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका (1997 आणि 2002) होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button