breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : कट्टर प्रतिस्पर्धी भाजपा आमदार महेश लांडगे अन् शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांचे आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’

– आगामी महापालिका निवडणुकीत चित्र बदलण्याची शक्यता

– उबाळेंच्या वाढदिनी लांडगेंकडून सोशल मीडियावर शुभेच्छा

पिंपरी । महाईन्यूज ।विशेष प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदार संघातील एकेकाळी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले विद्यमान भाजपा आमदार महेश लांडगे आणि शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे या दोघांमध्ये आता ‘मिले सूर मेरा तुम्हारा…’ असे चित्र दिसत आहे. त्यामुळे भोसरीतील उरली-सुरली शिवसेना आमदार लांडगे आता गुंडाळणार…अशी चर्चा भोसरी आणि परिसरात रंगली आहे.

आमादार महेश लांडगे आणि शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांनी २०१४ मध्ये एकमेकांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. तत्पूर्वी महापालिकेच्या राजकारणातील लांडगे-उबाळे यांच्यात राजकीय चढाओढ दिसत होती. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुलभा उबाळे ‘युती’चा धर्म पाळत महेश लांडगे यांच्या प्रचाराच्या व्यासपीठावर आल्या. त्यावेळी त्यांनी लांडगे यांनी सुरू केलेल्या ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चा धागा धरीत विरोधी उमेदवारावर घणाघात केला होता. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लांडगे-उबाळे यांच्यात मनोमिलन झाले आहे.

        वास्तविक, भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेनाकडून २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. मात्र, सुलभा उबाळे या शिवसेनेच्या ‘रणरागिणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यातच आमदार महेश लांडगे यांच्याकडे आता भाजपा शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मुळात आमदार लांडगे यांच्या राजकारणाचा उदय हा सर्वपक्षीय समर्थकांच्या बळावर झाला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात राखण्यासाठी आमदार लांडगे ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’च्या आधारे सर्वपक्षीय नगरसेवक-पदाधिकारी यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राज्यात सत्ता असतानाही सुलभा उबाळे ‘वंचित’

राज्यात महाविकास आघाडी पर्यायायाने शिवसेनेची सत्ता आहे. एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शिवसेना नगरसेवक आणि गटनेत्या म्हणून लढणारी रणरागिनी असलेल्या सुलभा उबाळे यांना २०१७ च्या निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. महापालिका गाजवणाऱ्या उबाळे राजकारणातून बाजूला गेल्याचे चित्र निर्माण झाले. पण, २०१९ मध्ये राज्यात शिवसेना अर्थात महाविकास आघाडीची सत्ता आली. जिल्हा संघटक पदाची जबाबदारी असलेल्या सुलभा उबाळे यांना महामंडळ किंवा राज्यस्तरीय समितीवर संधी मिळाली, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही शिवसेना पक्षश्रेष्ठींकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला ताकद वाढवायची असेल तर उबाळे यांच्यासारख्या आक्रमक चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. परिणामी, आगामी महापालिका निवडणुकीत चित्र वेगळे दिसू शकते, असा कयास राजकीय जाणकार बांधताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button