TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

रामनामाचे दीड कोटी वेळा लेखन

वडगावच्या सोपान म्हाळसकर यांनी ८० व्या वर्षांतही जोपासला छंद

वडगाव मावळ : श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त व श्रीराम भक्त सोपान बाबूराव म्हाळसकर हे गेल्या ५८ वर्षांपासून दररोज रोजनिशीबरोबरच रामनाम जप लिहीत त्यांनी आत्तापर्यंत १ कोटी ५६ लाख वेळा रामनाम असून, लिहून काढले आहे. वयाच्या ८० व्या वर्षांतही त्यांनी आपला हा अनोखा छंद सुरू ठेवला आहे. सोपान म्हाळसकर हे वडगावचे माजी सरपंच असून येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे.

रामनाम जपाच्या अनोख्या छंदाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मी दोन वेळा अपघातातून बचावलो होतो. तेव्हा, नित्यनेमाने ईश्वराच्या नामस्मरणाचा सल्ला मिळाला होता. रामनाम जप सर्वांत सोपा असल्याने तेव्हापासून ते आजतागायत दररोज नित्यनेमाने हा छंद जोपासला आहे. दररोज पहाटे पाच वाजता उठून स्नान, संध्या झाल्यानंतर सुरुवातीला रामनाम जप करतानाच तो लिहून काढतो व त्यानंतर रोजनिशी लिहीत आहे. सुरुवातीला दररोज तीनशे वेळा हा जप करत होतो. त्यात हळूहळू वाढ करून सध्या दररोज सोळाशे वेळा रामनाम जप करत आहे. ५८ वर्षांत आत्तापर्यंत १ कोटी ५६ लाख वेळा हा जप झाला आहे. ”

म्हाळसकर यांनी देशातील अनेक तीर्थस्थळांना भेटी दिल्या असून श्रीरामावरील श्रद्धेपोटी आत्तापर्यंत सात वेळा ते अयोध्येला गेले आहेत. १९९२ च्या कारसेवेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. भूमिहीनांसाठीचा जंगल सत्याग्रह, १९६५ चे कच्छ करार आंदोलन व १९७१ चे बांगला आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.

वृत्तपत्रातील कात्रणांचाही संग्रह

■ सोपानराव म्हाळसकर जेमतेम आठवी शिकलेले आहेत. मात्र, दररोज ते वृत्तपत्र वाचतात. अगदी जुन्या काळातील ज्ञानप्रकाश व ज्ञानदीप ही वृत्तपत्रेही त्यांच्याकडे पहावयास मिळतात. त्यांनी गेल्या ५०-६० वर्षांत वृत्तपत्रांत छापून आलेल्या ऐतिहासिक, धार्मिक आदी विषयांवरील लेखांची कात्रणेही जपून ठेवली आहेत. अनेक लेखकांशी पत्रव्यवहारही केला आहे. १९८८ पासूनच्या रामजन्मभूमी आंदोलनाविषयी व श्रीरामांविषयी छापून आलेल्या अनेक लेखांचाही त्यांच्याकडे संग्रह आहे. पोटोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ग्रंथालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button