ताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यात जन्म-मृत्यू दाखला प्रतीच्या दरात पाचपट वाढ

ठाणे | जन्म अहवाल, मृत्यू कारण अहवाल पुस्तिका आणि जन्म-मृत्यू दाखल्याचा दर छपाई खर्चापेक्षा कमी आकारला जात असल्याने महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे २० वर्षांनंतर या दरात पाचपट वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार जन्म-मृत्यू दाखला २० रुपयांऐवजी १०० रुपयांना तर, जन्म, मृत्यू अहवाल पुस्तिका ४५ रुपयांऐवजी ३५० रुपयांना मिळणार असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य विभागामार्फत जन्म-मृत्यू दाखले देण्यात येतात. एका दाखल्याची प्रत महापालिका नागरिकांना २० रुपयांना देते. या एका दाखल्याच्या छपाईसाठी महापालिकेला २० रुपयांचा खर्च येतो. तसेच जन्म आणि मृत्यूची नोंद करण्यासाठी महापालिका खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना जीवित जन्म दाखला, उपजत मृत्यू आणि मृत्यू कारण अहवाल अर्ज पुस्तिका उपलब्ध करून देते. त्यासाठी महापालिका खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून प्रती पुस्तकामागे ४५ रुपये घेते. परंतु या पुस्तिकांच्या छपाईचा दर १०० ते १२५ रुपये इतका आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याशिवाय, महापालिका ४५ रुपयांत पुस्तिका उपलब्ध करून देत असली तरी खासगी वैद्यकीय व्यावसायिक नागरिकांकडून जास्तीचे पैसे आकारतात.

जन्म अहवाल, मृत्यू कारण अहवाल पुस्तिका आणि जन्म-मृत्यू दाखल्यासाठी २६ जुलै २००२ मध्ये हे ठरविण्यात आले होते. गेल्या २० वर्षांत या दरात वाढ कोणतीही दर वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे महापालिका प्रशासनाने आता या दरात पाच पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button