ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराष्ट्रिय

तळेगावात महाआरतीमध्ये ४५ मंडळांचा सहभाग

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

तळेगाव दाभाडेः अयोध्येतील प्रभू रामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त तळेगाव शहरातील ऐतिहासिक श्रीराम मंदिर, ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरासह गावातील इतर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दाभाडे आळीतील श्री राममंदिरात १६ जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या राममंदिरामध्ये आयोजित केलेल्या महाआरतीमध्ये शहरातील सुमारे ४५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर आठ भजनी मंडळांनी भजनसेवेत सहभाग नोंदविला.

सोमवारी (दि. २२) पहाटे राममंदिरापासून रामधून यात्रेद्वारे ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. ही यात्रा दाभाडे आळी, डोळसनाथ मंदिर चावडीचौक, गणपतीचौक, बाजार पेठ, तेली आळी मारुती मंदिर चौक, जीजामाता चौक मार्गे शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज माऊली दाभाडे यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची विशेष माहिती दिली.
मंदिरामध्ये दाभाडे आळीतील राम आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, उपनगराध्यक्ष सतेंद्रराजे दाभाडे, श्रीमंत उमाराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, रवींद्र भेगडे, संतोष दाभाडे पाटील यांचे हस्ते महाआरती घेण्यात आली. यावेळी प्रणव दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच विविध मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र पठण अखंड हरिनाम जप व रात्री दिपोत्सव साजरा करण्यात आला. गेली आठवडाभरापासून शहरातील विविध मंदिरांमध्ये रामजप व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक विजेची रोषणाई व सुंदर रांगोळ्या तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button