breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्या; उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. तेव्हापासून अद्यापही याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आता पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कायद्यानुसार सहा महिन्यांत घेण्याची तरतूद आहे. असे असताना ही पोटनिवडणूक का घेण्यात आली नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. तसेच, याबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देण्याचा इशारा यापूर्वी आयोगाला दिला होता.

हेही वाचा  –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांसह दहा-बारा अधिकारी घरी बसणार?

याचिका काय?

पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणारी आणि पोटनिवडणुकीच्या आदेशाची मागणी करणारी याचिका पुणेस्थित सुघोष जोशी यांनी केली होती. पोटनिवडणूक न घेण्याबाबत आयोगाला मिळालेल्या प्रमाणपत्रालाही याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button