पिंपरी / चिंचवड

कामगार महिलेस बेदम मारहाण : तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीत काम करत असताना अपमानास्पद बोलल्यावरून दोन कामगारांमध्ये वाद झाला. त्यानंतर तिघांनी मिळून महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 30) दुपारी चार वाजता आंबेठाण येथील सिस्का एलईडी कंपनीत घडली.

भीमाबाई निगप्पा राठोड (वय 30, रा. आंबेठाण खेड) असे जखमी कामगार महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंकी शर्मा, सुरज शर्मा, अभिषेक शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिस्का एलईडी कंपनीत काम करत असताना कामगार सुरज शर्मा हा त्यांना कंपनीतील कामावरून अपमानास्पद बोलला. त्याबाबत फिर्यादी एचआर ऑफिसमध्ये थांबल्या. त्यावेळी आरोपी सुरज शर्मा याची पत्नी पिंकी शर्मा तिथे आली. तिने फिर्यादीस अपमानास्पद बोलून शिवीगाळ केली. त्यांनतर एचआरने फिर्यादी यांना वरिष्ठांकडे पाठवले. त्यावेळी आरोपी पिंकीने फिर्यादीच्या अंगावर धावून येत त्यांना धक्काबुक्की केली. कंपनीतून घरी जात असताना आरोपी पिंकीने फिर्यादीचे केस ओढले. सुरज शर्मा याने डोक्यात दगड मारला. तर अभिषेक शर्मा याने कंपनीच्या गेटवरून उडी मारून आत येत फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या डोक्याला दोन टाके पडले आहेत. त्यांच्या छातीस, हाताला आणि पायाला मार लागला आहे. सहाय्यक फौजदार बाबुराव राठोड तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button