breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आई, वडीलांच्या सेवेने पुण्य मिळते- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

पिपंरी: आई, वडीलांची मनोभावे सेवा केल्याने जे पुण्य मिळते, ते चारिधाम यात्रा करुनही मिळत नाही. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेली युवा पिढी आई वडीलांकडे, ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करुन आभासी जीवन जगण्यात मश्गुल आहे. पै. मारुतराव जमदाडे व अंजनाबाई जमदाडे यांच्या चिरंजीवांनी आयोजित केलेला सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व कार्यगौरव पुरस्कार हे कार्यक्रम पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतील असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
वाकडगावचे रहिवाशी पै. मारुतराव दामोदर जमदाडे व अंजनाबाई मारुतराव जमदाडे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात अजित पवार यांच्या हस्ते जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हभप निवृत्ती महाराज देशमुख, माजी खा. नाना नवले, आ.लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, नगरसेवक राहुल कलाटे, मयुर कलाटे, संदीप कस्पटे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, पीडीसीसी बँकेचे संचालक आत्माराम कलाटे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, कन्हैयालाल भुमकर, बबनराव जमदाडे, कांतीशेठ भुमकर, तुकाराम जमदाडे, नाना शिवले, भरतशेठ आल्हाट, राजूशेठ पोपट करपे आदी उपस्थित होते.
यावेळी हभप तुकारामआण्णा भुमकर (महाराष्ट्र भुषण, मृदुंगाचार्य), हभप समाजभूषण शांताराम महाराज निम्हण (सांप्रदायिक क्षेत्र), हभप पांडूरंगआण्णा दातार (महाराष्ट्र भुषण, मृदूंगाचार्य), पै. आप्पासाहेब खुटवड (कुस्तीक्षेत्र), तुकारामभाऊ गुजर (शिक्षण व सहकार), विजुशेठ पांडूरंग जगताप (उद्योजक), पै. अमोल प्रभाकर बुचडे (हिंद केसरी) यांना अजित पवार यांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अजित पवार म्हणाले की,  मारुतराव जमदाडे यांनी कुस्तीवर प्रेम करीत चरितार्थासाठी शेती करीत सायकलवर पिंपरी चिंचवड व पुण्यात दुध, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या मुलांना सुक्षिशित केले. व्यवसाय करीत असताना जमदाडे कुटूंबियांनी सामाजिक संपर्क देखील उत्तम ठेवला. त्यामुळेच आज हजारों नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी किर्तन सेवेत सांगितले की, आज आई, वडीलांकडे दुर्लक्ष करुन कुत्र्या, मांजरावर प्रेम करणारे दिसतात. मात्र, वाकड गावचे रहिवाशी पै. मारुतराव दामोदर जमदाडे व अंजनाबाई मारुतराव जमदाडे यांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार केल्यामुळे त्यांच्या मुलांनादेखील सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आहे. समाजात उल्लेखनिय कार्य करणा-यांचा त्यांनी गौरव केला. हि अभिमानाची बाब आहे असेही देशमुख म्हणाले.
स्वागत बाळासाहेब जमदाडे, सुत्रसंचालन नाना शिवले आणि आभार अंकुश जमदाडे यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button