पिंपरी / चिंचवड

मित्रावर शस्त्राने वार करणा-या मित्रावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

मस्करीत शिवीगाळ केल्याने शिवीगाळ कशाला करतो, असा जाब विचारल्यावरून मित्राने मित्रावर धारदार शस्त्राने वार करून तसेच चावा घेऊन मित्राला जखमी केले. ही घटना 31 जानेवारी 2022 रोजी दुपारी दोन वाजता बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडली.

प्रकाश भिकू गायकवाड (वय 40, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश जावळे (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड आणि आरोपी हे मित्र आहेत. फिर्यादी पेंटिंग काम करतात. सोमवारी (दि. 31) दुपारी दोन वाजता फिर्यादी यांच्या घरासमोर दोघेजण बोलत होते. त्यावेळी आरोपी महेश जावळे आणि त्याचा मित्र यांच्यामध्ये मस्करीत शिवीगाळ सुरु होती. त्यामुळे फिर्यादी यांनी ‘शिवीगाळ कशाला करतो’ असे विचारले. त्यावरून आरोपी महेश याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून धारदार हत्याराने डोक्यात वार करून जखमी केले. तसेच डाव्या हाताच्या पोटरीवर व डाव्या खांद्याजवळ चावा घेऊन फिर्यादी यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र घिगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button