पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या सात घटना : दोन लाख 32 हजारांचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या आणखी सात घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये चार वाहन चोरी, सायलेन्सर, सोने आणि मोबाईल चोरीच्या तीन घटना आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 31) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

श्रीहरी माधवराव इबितवार (वय 19, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता यशवंतनगर चौकात कंपनीत कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादी 25 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

सुधीर दिनकर कुलकर्णी (वय 40, रा. दिघी गाव) यांची 15 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भोसरी उड्डाणपुलाखालून चोरून नेली. याबाबत कुलकर्णी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवनकुमार बोदुलाल जाट (वय 30, रा. काळेवाडी) यांची 15 हजारांची दुचाकी ऑलिव्ह ग्रुप ऑफ हॉटेलच्या बाजूला पार्क केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी जाट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शंकर दीपक कांबळे (वय 33, रा. चिखली) यांची 20 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याबाबत त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामदास किसन नलावडे (वय 35, पुनावळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 10 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी डांगे चौकातून चोरून नेली आहे.

रेश्मा अलिमुद्दीन कुरेशी (वय 54, रा. विजयनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 80 हजारांची सोन्याचे साखळी चोरून नेली आहे. तुषार विठ्ठलराव जंगले (वय 29, रा. मोई, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या त्यांच्या इको गाडीच्या सायलेन्सर मधील पाईप कॉम्प (कॅतिनिक कन्व्हेटर) हा 67 हजार 388 रुपयांचा पार्ट चोरट्यांनी चोरून नेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button