breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘इंद्रायणी थडी’तून ‘पूजाताईं’चा महिला सक्षमीकरणाचा निर्धार  

  • महिला नोकरी महोत्सवात 1 हजार 230 महिलांच्या मुलाखती
  • तब्बल 306 महिलांना विविध कंपन्यांनी दिले ऑफर लेटर 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत शिवांजली सखी मंचच्या संस्थापिका पूजा महेश लांडगे यांनी खास महिलांसाठी नोकरी महोत्सव भरविला असून आज शनिवारी 1 हजार 230 मुलाखती झाल्या. त्यातील 360 जणींना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले आहे.

हा महोत्सव शनिवार (दि. 9) आणि रविवार (दि. 10) रोजी भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी, गावजत्रा मैदान येथे भरविलेला आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या मेळाव्यात सुशिक्षीत तरुणींचा सहभाग वाढत आहे. या  मेळाव्यात बीपीओ, एनजीओ, रियल इस्टेट, रिटेल, ऑटोमोबाईल, हेल्थकेअर, शिक्षण, बँकिंग, व्यवस्थापन, हॉस्पिटॅलिटी, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल, केपीओ, सुरक्षा, फायनान्स, विमा, हॉस्पिटल यांसारख्या विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी आहेत. हजारो महिला भगिनींना यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इंद्रायणी थडी निमित्त भोसरी विधानसभा मतदार संघातील महिलांना आपले कर्तृत्व दाखविण्याची अनोखी संधी मिळाली आहे. जॉब फेअरच्या माध्यमातून त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध आहेत. पाचवी ते पदवीधर, एमबीए, डिप्लोमा, आयटीआय, तसेच पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवार या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. मुलाखतीमध्ये पात्र होणा-या महिला उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात येत आहे. पूर्व नोंदणी केलेल्या सुमारे 4 हजार 500 महिलांपैकी शनिवारी 1 हजार 230 मुलाखती झाल्या आणि 306 जणी पात्र ठरल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button