breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सरकारमध्ये राहणार की बाहेर पडणार? छगन भुजबळ म्हणाले..

मुंबई :  रविवारी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आजही पुन्हा बैठक होत आहे. त्या बैठकीआधी छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरनंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. जरांगेंना जीआर दिल्यानंतर भुजबळांनी संताप व्यक्त करत त्याला जोरदार विरोध केला. सतत आक्रमक वक्तव्येही भुजबळ करत आहेत. आता ओबीसींच्या बैठकीबाबत भुजबळ म्हणाले की,  दिवसभर कोणाची काय चर्चा आहेत, हरकती नोंदवायचे आहेत, या संदर्भात चर्चा होईल. जाहीर सभा होणार आहे त्याच देखील काम सुरू आहे.

ओबीसी यात्रा काढायची आहे त्या संदर्भात देखील कमिटी नेमलेली आहे. रूट आणि दिवस कोणता असेल याबाबत देखील काम करण्याची तयार सुरू असल्याची माहिती भुजबळांनी दिली. दरम्यान, भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसीचे नुकसान होत असल्याचं जोवर समोर येत नाही तोवर भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय. यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा – पॅरिसमधील मोनालिसाच्या जगप्रसिद्ध पेंटिंगवर फेकण्यात आलं सूप; व्हिडीओ व्हायरल

छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी महासंघ सहमत नसेल तर नसेल. आमच्यात  ३७४ वाटेकरी होते. त्यांना आम्ही सामावून घेतलं होतं. आता हजार वाटेकरी आहेत. ओबीसीच्या ५४% मध्ये आणखी २०-२५ टक्के घुसवले. शाहू महाराजांनी आरक्षण देताना डुबले आहेत त्यांना आरक्षण द्यावा असं त्यांनी सांगितलं होतं. ३७४ जातीच आरक्षण संपल्यात जमा असं आम्हला वाटतं म्हणून आम्ही बोलतो.

एका बाजूला सरकारची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला भुजबळ यांच्याकडून विरोध यावरून त्यांना सरकारमध्ये राहणार की बाहेर पडणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, आता हे सरकारने आणि माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची चिंता नाही. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. सरळ जाऊन सांगा तुम्ही याला काढा म्हणून.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button