breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पंतप्रधान मोदींच्या पेनाची किंमत २५ लाख’; संजय राऊतांचा दावा

मुंबई | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपा नेत्यांना साधेपणाने राहण्याचा सल्ला दिला, त्यानंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या श्रीमंतीकडे बोट दाखविले. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पेनाची किंमत २५ लाख रूपये आहे, असा दावा त्यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांना साधेपणाने राहण्याचा सल्ला दिला. ५० लाखांचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका, सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, असे जेपी नड्डा म्हणाले. म्हणजे मोदी करतात तसं गरीबीचं ढोंग करा, असे त्यांना सुचवायचं असेल.

हेही वाचा     –    महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर! दोरीला ग्लुकोजच्या बाटल्या लटकवून उपचार सुरू 

जेपी नड्डा यांचा सल्ला खरंतर पंतप्रधान मोदी यांनाच लागू पडतो. मोदींइतकी श्रीमंती गेल्या ७० वर्षांमध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नव्हती. मोदींचा हा श्रीमंतीचा थाट जनतेच्या पैशावर सुरू आहे. निवडणूक रोखे आणि पीएम केअर फंडात अब्जावधींच्या भ्रष्टाचाराची रक्कम भरण्यात आलेली आहे, त्यावर हा थाट सुरू असल्याचीही टीका संजय राऊत यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशाला असलेल्या पेनाची किंमत २५ लाख रुपये आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. तसेच मोदींच्या हातातील घड्याळ, त्यांचे कपडे अतिशय महागडे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. मोदी ज्या विमानातून फिरतात, ते खास त्यांच्यासाठी २० हजार कोटी खर्च करून घेतले आहे. मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश असून त्यात चहा विकणारा कुणीही नाही. भाजपा एकाबाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडते. शेतकऱ्यांची हत्या करते, महाराष्ट्रातील गरीबांची थट्टा करते, आमदारांना ५० कोटी देऊन सरकारं बनविले जाते आणि दुसऱ्या बाजूला महागड्या गाड्या, घड्याळं वापरू नका, असे आवाहन केले जाते. जेपी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहीजे. भाजपाच्या शंभर टक्के नेत्यांच्या हातात महागडी घड्याळं आहेत. ९० टक्के भाजपा नेते परदेशी गाड्यातून फिरतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button