breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काँग्रेसकडून गोवा विधानसभा निवडणूकसाठी ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पणजी | टीम ऑनलाइन
गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी आता काँग्रेसकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली गेली आहे. या यादीत म्हापसा, ताळगाव, फोंडा, मुरगाव, कुडतरी, मडगाव, कुंकळ्ळी, केपे या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, सर्वात आधी उमेदवार घोषित करुन काँग्रेसने आघाडी घेतल्याचं बघायला मिळत आहे.

काँग्रेसकडून जाहीर केलेली यादी

  • म्हापसा – सुधीर कानोळकर
  • ताळगाव – टोनी रॉड्रिग्ज
  • फोंडा – राजेश वेर्णेकर
  • मुरगाव – संकल्प आमोणकर
  • कुडतरी – आलेक्स रेजिनाल्ड
  • मडगाव – दिगंबर कामत
  • कुंकळ्ळी – युरी आलेमाव
  • केपे – एल्टन डिकास्टा
    दरम्यान, `काँग्रेसने उमेदवार घोषित केले, याचा अर्थ काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊत हे राहुल गांधींना भेटले होते. तेव्हा गोव्यावर चर्चा झाल्याचं ते म्हणाले होते. पण या यादीमुळे काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नसल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं आपला पक्ष दोन दिवसांपूर्वी टीएमसीत विलीन केला आहे. चर्चिल आलेमाव हे तांत्रिकदृष्ट्या टीएमसीचे गोवा विधानसभेतील पहिले आमदार झाले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button