breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shaitan Movie | बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण ‘शैतान’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले आहे.

अजय देवगणने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शैतान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा    –    पॅरिसमधील मोनालिसाच्या जगप्रसिद्ध पेंटिंगवर फेकण्यात आलं सूप; व्हिडीओ व्हायरल 

शैतान चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आर माधवन आमने-सामने येणार आहेत. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. शैतान हा गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

अजय देवगनचे २०२४ मध्ये पाच सिनेमे रिलीज होणार आहेत. ‘शैतान’सह अजयचे ‘औरों में कहां दम था’,’मैदान’,’सिंघम अगेन’,’रेड २’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. २०२४मध्ये अजयचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button