breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

पॅरिसमधील मोनालिसाच्या जगप्रसिद्ध पेंटिंगवर फेकण्यात आलं सूप; व्हिडीओ व्हायरल

Mona lisa Painting | जग विख्यात चित्रकार लिओनार्डो द विंची यांनी काढलेले ‘मोनालिसाचे अजरामर चित्र हे सध्या पॅरीसच्या लुवर या म्युझियममध्ये आहे. या चित्रावर दोन महिलांकडून सूप फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चित्रावर बुलेटप्रूफ काच होती त्यामुळे या चित्राला काहीही झालेलं नाही. मात्र, दोन महिला कार्यकर्त्यांनी या काचेवर सूप फेकलं, संग्रहालयातील सुरक्षेला चकवा देत त्या या ठिकाणी आल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार दोन महिला कार्यकर्त्या आल्या आणि त्यांनी सरकार तसंच प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की अधिक महत्त्वाचं काय आहे कला की निरोगी आणि योग्य अन्नप्रणाली? कृषी व्यवस्था खराब आहे, शेतकरी काम करताना मरत आहेत. त्यामुळे पर्यावरण तसंच अन्न स्रोतांची गरज अधोरेखित व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन केलं असं या पर्यावरणवादी महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा   –    पुढच्या ७ दिवसांत देशात CAA लागू होणार? केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण 

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

लूवर संग्रहालयात दोन महिला येतात. त्या मोनालिसाच्या चित्राजवळ जातात. तसंच त्या मोनालिसाचं चित्र ज्या काचेच्या पलिकडे आहे त्यावर सूप फेकतात हे दिसतं आहे. मात्र मोनालिसाच्या चित्रावर बुलेटप्रूफ काच लावण्यात आली असल्याने या चित्राचे कुठलेही नुकसान झालेले नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याआधी एका २०२२ च्या आंदोलनादरम्यान मोनालिसाच्या चित्रासमोरची काच दाबण्यात आली होती. तसंच ऑक्टोबर २०२२ मध्ये लंडन येथील नॅशनल व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या सूर्यफुलाच्या चित्रावर सूप फेकण्यात आले होते. इंधनाच्या वाढत्या किंमती, धोरणांमध्ये झालेले बदल यांचा निषेध करत नुकतीच काही शेतकऱ्यांनी फ्रान्समध्ये निदर्शनं केली होती. त्यानंतर आता मोनालिसाच्या चित्रावर सूप फेकण्याची घटना समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button