TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

वार्षिक दसरा मेळाव्यावरून शिवसेनेची कोंडी केली जात असताना संघर्षांची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घ्यावी : शरद पवार

मुंबई : वार्षिक दसरा मेळाव्यावरून शिवसेनेची कोंडी केली जात असताना संघर्षांची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. दसरा मेळाव्यावरून राज्यात वाद होत आहे. मेळावे घेण्याचा सर्वाना अधिकार आहे. पण यावरून वाद टाळले पाहिजेत.

सामोपचाराने यावर तोडगा काढता येईल, असेही पवार यांनी म्हटले आहे. दसरा मेळाव्यावरून शिंदे गट, भाजप सारेच शिवसेनेची कोंडी करीत असताना एकाकी पडलेल्या शिवसेनेच्या मदतीला राष्ट्रवादी धावून आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे येत्या गुरुवारी (८ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची  नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून आपण स्पर्धेत नसल्याचे शरद पवार तसेच नितीशकुमार या दोघांनीही स्पष्ट केले आहे. पण विरोधकांची संयुक्त मोट बांधण्यासाठी प्रयत्न करू, असे उभयतांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button