breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करावी – माजी आमदार विलास लांडे

  • [clear]उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार

पिंपरी /  महाईन्यूज 

लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही. त्यातही तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व १८ वर्षापर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करावी, अशी मागणी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिकेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात विलास लांडे यांनी नमुद केले आहे की, कोविड संसर्गाचा धोका सातत्याने वाढत आहे. कोरोना तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरु शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button