breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘उद्योगनगरी’त महामेट्रोचे सहा डब्यांचे कोच दाखल, भक्ती-शक्ती चाैकात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

पिंपरी |महाईन्यूज|

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे सहा डबे (कोच) पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी) दाखल झाले आहेत. निगडीच्या भक्ती-शक्ती चाैकात मेट्रोच्या पहिल्या सहा डब्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

पुणे मेट्रोची बांधकाम, रेल टाकण्याचे काम, विद्युत तारांचे काम, सिग्नल सिस्टिमचे काम आदी कामे प्रगतीपथावर आहेत. आज पुण्यामध्ये मेट्रोचे दोन ट्रेन संच दाखल झाल्या आहेत. एका ट्रेन संचात तीन मेट्रो कोच आहेत. हे ट्रेन संच नागपूर मेट्रोला देण्यात येणाऱ्या नवीन ट्रेन संचाच्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत सीआरआरसीकडून घेण्यात आले आहेत.

मेट्रोचे दोन संच नागपूरहून रविवारी (दि. 22) पुण्याकडे रवाना झाले होते. तब्बल आठ दिवसांच्या प्रवासानंतर हे कोच आज, रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. पुण्यात कोच डेपोचे काम अद्याप झाले नाही. प्रत्येक संचामध्ये तीन डबे आहेत. त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव आहे. एका मेट्रो ट्रेनमध्ये 950 ते 970 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

पुण्याला मिळणाऱ्या दोन्ही संच नवीन असून त्यांच्या प्राथमिक चाचण्या नागपूरला करण्यात आल्या आहेत. सध्या पुणे येथील कोचिंग डेपोची कामे पूर्ण झाले नसल्यामुळे या ट्रेन संचाला पहिल्यांदा नागपूरला नेण्यात आले. आवश्यक ती उपकरणाची जोडणी करण्यात आली आहे. पुणे मेट्रो बाह्य रंगसंगती, त्याची रंगरंगोटी करून हे ट्रेन संच पुण्यासाठी आले आहेत. ट्रेन संच पुण्यात दाखल झाल्यावर पुणेकरांना मेट्रो कोच बघायला मिळणार आहे.

आतापर्यंत पुणेकरांना मेट्रोचे विविध अंगे बघितली आहेत. परंतु ज्या मेट्रो कोचमध्ये पुणेकर प्रवास करणार आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना आता घेता येणे शक्य होणार आहे. मेट्रो कोचमध्ये असलेली बैठक व्यवस्था, सूचना प्रणाली, व इतर गोष्टींची जवळून अनुभव लोकांना आता बघता येइल. हे ट्रेन संच पुण्यात दाखल झाल्यामुळे पीसीएमसी येथील उन्नत मार्गावर ते चढवण्यात येणार आहेत. त्याद्वारे मेट्रो ट्रेनची चाचणी सुरु होईल.

हे ट्रेन संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनविले आहेत. वजनाला हलके असलेल्या या ट्रेन संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दिवे लावलेले आहेत. बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेचे आतील दिवे कमी अधिक तीव्र करण्याची यंत्रणा आहे. या ट्रेनचा अधिकतम वेग ९० किमी असून या ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा, प्रवाशांसाठी दृक श्राव्य सूचनाप्रणाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button