breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

Budget 2024 | अंतरिम बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले, वाचा सविस्तर..

Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं? पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.

७ शहरांना सूर्योदय योजना मिळणार

  • प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशात सौरऊर्जा अधिकाधिक वाढविण्यात येणार.
  • राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, लातूर, नाशिक आणि पुणे या ७ शहरांचा समावेश.
  • मार्च अखेर या शहरांत प्रत्येक २५ हजार सोलर रूफटॉफ बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

राज्यातील रेल्वेसाठी १५,५५४ कोटी

  • राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५,५५४ कोटींची तरतूद करण्यात आली.

हेही वाचा    –     रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षणांच्या भेटीला!

  • नव्या मार्गासाठी १,९४१ कोटी, गेजचेंजरसाठी ३०० कोटी, इतर कामांसाठी २३६ कोटी.
  • सुरक्षा व पुलांसाठी ७५६ कोटी.
  • वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी ७५० कोटी, तर नगर-बीड-परळीसाठी २७५ कोटी रूपये.

साखर कारखान्यांना १० हजार कोटींचा लाभ

  • कृषी पतसंस्थांना मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा देण्यात आला.
  • त्यामुळे त्यांना कोल्ड स्टोरेजपासून पेट्रोलपंप पर्यंतचे व्यवसाय करता येतील.
  • FRP साठी २०१६ पूर्वी कारखान्यांनी केलेला खर्च करसवलतीस ग्राह्य धरण्यात येणार.
  • महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास १० हजार कोटींचा कर भरावा लागणार.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button