breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कै. पै. मारुती नानांनी कब्बडीत शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रीय खेळाडू कै.पै.मारुती (नाना) सहादू कंद यांनी कब्बडी या खेळात पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करुन जास्तीत जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होतील, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.८ इंद्रायणीनगर से.क्र.३ मध्ये नव्याने विकसित केलेल्या स्केटिंग रिंक ग्राउंडचे राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद असे नामकरण व त्याचे उदघाटन आमदार महेश लांडगे यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. आज महापौर राहुल जाधव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसदस्य नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, स्विकृतसदस्य विजय लांडे, गोपीचंद धावडे, माजी नगरसेवक दत्ता लांडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे, कार्तिक लांडगे, आकाश कंद, विजय फुगे, गणेश फुगे, अविनाश शिंदे, समीर ढगे, नितीन धोत्रे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंक ग्राउंड हे २.४७ एकर जागेत तयार केले आहे. पिंपरी-चिंचवड मधील एकमेव रिंक आहे. २०० मी. परिघाचे स्केटिंग रिंक नवोदित खेळाडूंसाठी, १०० मी. सराव रिंक, त्यासाठीचे कोटींग परिसराला सिमा भिंत, वाहनतळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची, इ.सोयीसुविधांसह कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत. या कामी एकूण २ कोटी २७ लाख खर्च आलेला आहे. हे ग्राउंड शहरातील खेळाडूंना वरदानच ठरणार आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आकाश कंद यांनी केले. तर, सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button