breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजन

रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षणांच्या भेटीला!

Ramayan Serial | २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचा अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक भक्त त्यांच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. रामानंद सागर यांची रामायण ही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका जी १९८७ मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली होती. त्यावेळी रामायण या मालिकेने सर्वांच्याच मनावर राज्य केले होते. अशातच आता रामायण ही मालिका पुन्हा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘रामायण’ ही मालिका डीडी नॅशनलवर प्रसारित होणार आहे. नुकतीच याबाबत दूरदर्शन नॅशनलच्या (डीडी नॅशनल) अधिकृत X हँडलवर माहिती देण्यात आली आहे. रामायण मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं आता प्रेक्षकांना आनंद झाला आहे.

हेही वाचा    –    ‘इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही’; प्रकाश आंबेडकरांचं विधान चर्चेत 

‘रामायण’ ही मालिका त्यावेळी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका होती. ती पाहण्यासाठी लोक एकत्र जमायचे. १९८७ साली ही मालिका प्रसारित झाली होती. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचे पाहायला मिळते. आता ही मालिका पाहायला मिळणार म्हणजे ‘मंगल भवन अमंगल हारी..या ओळी पुन्हा कानावर पडणार आहे. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button