breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शक्तीप्रदर्शन करत आमदार जगतापांनी भरला उमेदवारी अर्ज

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज भरला. सकाळपासूनच त्यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पिंपळेगुरव येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन आणि सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात केली.

पदयात्रेच्या सुरूवातीलाच धनगर बांधवांनी अहिल्यादेवी पुतळा परिसरात गजीनृत्य सादर करून जोरदार वातावरणनिर्मिती केली. अहिल्यादेवी पुतळा परिसरात आमदार जगताप यांचे स्वागत होताच महिलांनी फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, शिवसेनेच्या मंगला भोकरे, विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, जवाहर ढोरे, धनंजय ढोरे, चेतन शिंदे, विजय साने, अजय दुधभाते, सूर्यकांत गोफणे, कांता कांबळे, आप्पा ठाकर, दत्ता एनपुरे आदी उपस्थित होते.

आमदार जगतापांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया

आमदार जगताप यांनी जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर अहिल्यादेवी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली. पुढे ढोरेनगर, शितोळेनगर, बॅक ऑफ महाराष्ट्र, साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, पिंपळेगुरव, सृष्टी चौक, वैदुवस्ती, सुदर्श चौक, स्वराज गार्डन, पिंपळेसौदागर येथील काटे चौक, पिंपळेसौदागर गावठाण, रहाटणी, काळेवाडी, तापकीर चौकमार्गे थेरगाव येथील बापुजी बुवा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेतले. पुढे चापेकर चौकातील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पदयात्रेचा समारोप केला. त्यानंतर त्यांनी दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button