breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचा पैलवान अजय लांडगे यांची ‘एनआयएस’ परीक्षेत यशस्वी कामगिरी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडचे पैलवान अजय राजेंद्र लांडगे (मुंबई महापौर केसरी) यांची स्पोर्टस् आथाॅरिटी ऑफ इंडिया.नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (पटियाला) भारतीय खेळ प्राधिकरण (एन,आय,एस) कुस्ती प्रशिक्षक परीक्षेतमध्ये ‘अ ‘श्रेणी मिळून उत्तीर्ण झाले. 

मुंबई येथील साई सेंटर कांदिवली येथे कुस्ती प्रशिक्षक अभ्यास क्रम पूर्ण झाला. यामध्ये देशभरातून आलेल्या एकूण ७० जणांनी याचा अभ्यास केला. यातील १४ जण  A ग्रेड नी पास झाले. यात पैलवान अजय लांडगे यांचा समावेश आहे. अजय यांनी मिळवलेल्या प्राविण्य बद्दल पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने भारत केसरी पैलवान विजय हनुमंत गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी कामगार केसरी वस्ताद विलास नखाते, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचुत्रे, युवा महाराष्ट्र केसरी पैलवान किशोर नखाते, दिलीप बालवडकर, काळूराम कवितके, निलेश नखाते, कृष्णा तांबे, धोंडिबा लांडगे, ज्ञानेश्वर कुटे, आदी जणांनी अभिनंदन केले. 

अजयने मिळवलेल्या यशाबद्दल विजय गावडे म्हणाले की, पिंपरी चिंचवड च्या नवोदित कुस्तीगीर यांना विशेष माहिती यानिमित्ताने मिळणार आहे. कुस्ती शिकताना हा कोर्स जर केला, तर निश्चितच नवोदित कुस्तीगीर यांना याचा खूप फायदा होईल. भविष्यात असेच कुस्ती प्रशिक्षकाचे उजळणी वर्ग घेऊन. नवोदित कुस्तीगीर यांना देखील समाविष्ट करून. त्यांना कशाप्रकारे फायदा होईल. यावर जास्तीचा भर दिला जाणार आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button